.”बोल ना दीक्षा ! काय म्हणतेयस थांब ह मला जरा बूट काढूदेत ..हा झाले .आता बोल ” जीजू इथ या घरात .. दीक्षा त्या घडलेल्या घटना बद्दल अमित ला सांगणार होती ..पण तिने अचानक विषय बदलला .. का नाही माहित तिला अस जाणवल कि हे सांगणे आता बरोबर नाही राहणार..म्हणून ती थांबली आणि आनंदाने ओरडत म्हणाली … “जीजू ताई आई होणार आहे…” दीक्षा च्या तोंडून ते वाक्य ऐकून अमित च्या हातातील बूट खाली पडला त्याचे डोळे आश्चर्याने ..मोठे झाले होते.. अमित ला आनंदाचा धक्का बसला होता.. तो तसाच बूट खाली टाकून उठत अश्विनी जवळ जाऊ लागला त्याच्या चेहऱ्यावर हलके हलके हास्याचे प्रहर उमटू लागले होते…. तो बोलण्याचा प्रयत्न करीत होता …”म ममी मी ..मी बाबा मी वडील म्हणजे तू आई ..मी बाबा ..खरच !! अश्विनीने होकारार्थी लाजत मान हलवली ..कि अमित “ .oh myy god woooo hhhoo आशु आशु ..जानु आज आज तू मला जगातलं सगळ्यात सुंदर आणि गोड गिफ्ट दिलयस ” असे म्हणत तो तिला उचलणार होता .. कि थांबला नाही नाही ..अश्या अवस्थेत ..उचलन बरोबर नाही .. ओह god ..आशु I love you आशु .लव यु ..डीअर ..thanks देवा ..आणि आशु तुझ हि .. तुम्ही तुम्ही डॉक्टर कडे गेलात का ” अश्विनी म्हणाली नाही ..मला इथेच कळाले ..अमित समजला .. “ओह ठीक ठीक आहे आपण डॉक्टर कडे जाउयात आताच चल लवकर.. ” अश्विनी त्यास अडवत म्हणाली अरे पण ..इतक्या रात्री “अग सात तर वाजले आहेत.. तू चल आधी “अमित म्हणाला अश्विनीस नाईलाज होता तिला जावच लागणार होत.. दीक्षाच्या हि आणि अमितच्या हि डोळ्यात आनंदाश्रू आले होते.. अमित अश्विणीस मिठीत घेऊन ..पाणवला होता.. अश्विनी त्यास सरकवत म्हणाली “अरे दीक्षा पाहतेय” दीक्षा थोड दुसरीकडे चेहरा करून स्मित हस्य करू लागली… तिला पाहून अमित अश्विनी पासून दूर झाला आणि म्हणाला “चल मग जाऊन येउत..” अश्विनी तैयार होण्यास जाऊ लागली ..दीक्षा पुन्हा सतर्क झाली..आणि ती अश्विनीच्या मागोमाग गेली .. पण अमित ने तिला थांबवले ..”दीक्षा ..!” दीक्षा थांबली आणि अश्विनीला पाहत पाहतच म्हणाली “काय जीजू ?” मी अश्विनी साठी रॉकी आणला खरा आणि तुझ्या साठी पण काहीतरी आहे … येईल लवकरच .” दीक्षा समजू शकली नाही ती म्हणाली ”काय येतय? काय आणलय जीजू तुम्ही ?” अमित स्मित हस्य देत म्हणाला “येईल आल्यावर कळेलच तुला ” दीक्षा ठीक आहे म्हणत अश्विनी कडे जाऊ लागली ..पण समोरून अश्विनी तैयार होऊन आली..दीक्षा ने तिला थांबवल आणि म्हणली “आत बेडरूम मध्ये काही ?” अश्विनी गंभीर भावात म्हणाली “नाही काही नव्हत आत सध्या “… बर ठीक आहे जा तू .. अमित अश्विनीचा हात हातात घेऊन जाऊ लागला जाता जाता त्याचं बोलन सुरु होत..बोलता बोलता अश्विनी सहज म्हणून गेली अमित अरे ती खोली मागच्या बाजूची काही उघडत नाहीये… त्या कोपर्यातील तेव्हा अमित म्हणाला अग काय आशु तू पण हि वेळ काय कामाचे बोलण्याची आहे का ? काय आशु तू पण न ? चल जाऊ ..? तेवढ्यात इकडे दीक्षा ते ऐकून ताड्कन मागे वळली आणि तिने अश्विणीस हाक मारली ..”ताई थांब ! ” तिच्या त्या हाकेने अश्विनी दचकून थांबली .. आणि मागे वळली .आणि तिने हलकीशी मान हलवून विचारले.. “काय झाले ?” अमित पुन्हा म्हणाला काय झालय दीक्षा .. अहो काही नाही जीजू ..ताईला म्हणत होते कि त्या खोलीच्या चाव्या मला देता का मी साफ करते ती उघडून “ अमित म्हणाला “अग पण“ अश्विनीस कळून चुकले कि .. दीक्षाला काहीतरी तिथे सुगावा हवाय ..तिने पुढचे काही न बोलता आपल्या पर्स मधील चाव्या बाहेर काढल्या आणि दीक्षा कडे सोपवल्या आणि ते दोघे गेले .. ते जसे गेले तसा एक अनर्थ झाला … घरातील … लाईट गेली …