लाईट जाताच ..दीक्षाच्या तोंडून ..एक दचकून भीतीपोटी आवाज निघाला “नाहीईईइ..!!!” आणि या वेळी तो क्रूर रीतीने हसण्याचा आवाज …”ह्ह्हम्म्ह्ह्ह ह्ह्ह..” दिक्षाने तरी आपले मन आपल्या ताब्यात ठेऊन भानावर राहण्याचा प्रयत्न करीत होती… तीला अंधारात काहीच दिसत नव्हते .. दिक्षाने आपले एक पाउल उचलले .. तिच्या लक्षात होते ती जिथ उभा होती तेथून काही ६-८ पावलांवरती किचन होत आणि किचन मध्ये टेबलावरतीच मेणबत्ती आणि काडेपेटी होती .. दीक्षा हळू हळू चाचपडत चाचपडत जाऊ लागली… ती भिंतीवर एक हात ठेऊन जात होती… हा अंधार तिच्या जीवावर बेतणार कि काय असे तिला वाटत होत कारण अश्याच अंधारात पिशाचाच दुगन राज्य असत… तीच मन नकारात्मकतेने भरू लागल होत.. तिच्या मनात भीती निर्माण झाली होती आणि तेच तिच्यावर होणाऱ्या पुढच्या वाराच कारण होत… दीक्षा चाचपडत किचन मध्ये गेली..जाताच ती कशाला तरी जाऊन धडकली तो तिच्या नशिबाने टेबल होता आणि त्यावरच मेणबत्ती व काडे पेटी होती दीक्षा ने काडेपेटी उचलली तिचा हात भीतीने थर थर कापत होता प्रत्येक क्षण तिला जीवघेणा वाटत होता …आता काय होईल ? कधी कुठून कसे काय? पुढे येईल अंगावर धावेल कसला वार कोण करेल हे सगळे प्रश्न तिच्या मनात घूमत होते कि अचानक तिने काडेपेटीची काडी पेटवली ..कि समोर तिला एक विचित्र स्त्री उभा असेलेली जाणवली..तीचा पांढराशुभ्र चेहरा ..ती भयानक स्त्री वाटत होती,.. डोळ्यात काळेभोर काजळ ओठ लालभडक अंगात काळी साडी पांढरे केस आणि सूळे दात जिचा उजवा हात रक्तानी माखलेला होता ती.. दीक्षाला आणि दीक्षा तिला पाहतच उभे होते कि अचानक काडी विझली… दीक्षाच्या माथ्यावरती घामाचे थर जमा होत होते ..पुढची काडी पेटवताना ती सारखी सारखी तिच्या हातून सटकत होती. तरी हि कशीबशी करून ती पेटली ..”ख्ख्स्सस्स्स….” कि समोर कोणीच नव्हते यावेळी..दीक्षा ने मेणबत्ती पेटवली कि मागून तिच्या कोणीतरी पळत गेले दीक्षा चरकन मागे वळली कि मागे कोणीच नव्हते कि अचानक हॉल मधून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज दिक्षास आला दीक्षा हातात मेणबत्ती घेऊन हॉल कडे जाऊ लागली आणि हॉल मध्ये एक लहान मुलगी पांढऱ्या शुभ्र फ्रॉक मध्ये कोणाकडे तरी हाक मारत होती ..पण त्या हॉल मध्ये तिथ समोर कोणीच नव्हत पण ती मुलगी हॉल च्या मधोमध उभा राहून म्हणत होती कि ..”आन्ट्टी . मला उचलून घेना .. आन्ट्टी हिह्हिही…” तिने दिक्षास पाहिले आणि तीझ हसणे बंद झाले आणि ती रडू लागली …”मला ..मारू नका मी काही नाही केल प्लीज नका मारू मला “ असे म्हणत ती पळू लागली ..तिला पळताना पाहून दीक्षाही तिच्या माग धाऊ लागली.. ती मुलगी धावत धावत एका कोपऱ्यातील खोली जवळ जाऊन थांबली .. आणि आत पाहत रडू लागली… ती दीक्षा कडे मदत मागत होती… वाचव वाचव माझ्या आईला ताई “ बाबा मारतायत तिला .. ती तीच खोली होती जी अश्विनी उघडण्याचा प्रयत्न करीत होती .ती खोली उघडली होती आपोआप… आणि आतून एक प्रकाश बाहेर आला होता ..आतून दोघ जनाच्या साउल्या बाहेर पडत होत्या एक पुरुष जो चलताना हातात कुऱ्हाड घेऊन लंगडत आहे अस वाटत होत आणि एक स्त्री जी हात जोडू लागली होती गडगडून खाली लोळत होती . दीक्षा हळू हळू त्या मुलीकड जाऊं लागली ती मुली दीक्षा जवळ येताच त्या खोलीत धावली.. दीक्षा हि खोली जवळ पोहचली तिच्या हातात मेणबत्ती तशीच जळत होती.. ती जशी त्या खोली जवळ पोहचली त्या खोलीतील त्या साउल्या आणि ती मुलगी नाहीसी झाली आणि ती खोली उघडी राहिली..दीक्षा त्या खोलीजवळ पोहचली कि त्याच क्षणी.. आत तिला फक्त एक पियानो दिसला ..धूळ खात असेलला…पण स्थिती जणू नव्या सारखीच होती .. दीक्षा आत मध्ये गेली.. आत ती थेट पियानो जवळ जाऊन बसली.. तिथ अचानक तीच मुलगी आली . ती दिसण्यास जरा गोड होती .. दीक्षाला तिला पाहून जरास बर वाटले ..ती मुलगी तिला म्हणू लागली .. ताई वाजव न आई पण वाजवायची वाजव न ताई “ दीक्षा तिच्या कड पाहतच राहिली होती तिच्या मनात जरा भीती कमी झाली होती.. तिने पाहिलं बीप वाजवता क्षणी दीक्षा समोर एक लक्ख प्रकाश आला .. त्या प्रकाशात वेगवेगळे दृष्य दिसत होते… आणि त्याच प्रकाशात अचानक तिला एक एक करून सगळे दिसू लागले त्या घराचा इतिहास … आणि शेवटी दिसले कि त्या घरातील मुख्य सदस्याने .. आपल्या पत्नीस आणि मुलीस वेडाच्या भरात येऊन राक्षसा सारख्या निर्घृण वूत्ती ने त्या इवल्याश्या जीवाच्या आणि आपल्या प्रेमळ पत्नीच्या छातीत वार करून करून ठार केले होते… आणि स्वतः त्याने आत्महत्या केली होती…. दीक्षाच्या समोर काही तरी ठेवल होत तो एक कागद होता त्यावरती एक धून लिहिली होती .. दीक्षा पियानो वाजू शकत होती तिने ती धून वाजवण्यास सुरुवात केली ..ती बाजूची मुलगी .. उड्या मारू लागली.. पण आजूबाजूचे ठेवलेलं सामान धाड…!!धाड!!! हलु लागले.. दीक्षा ने वाजवणे बंद केले आणि ती बाहेर पळाली ती मुलगी मागून तिला ओरडू लागली “बाहेर नकोस जाऊ….