आणि तिने खणकन आदित्यचा कानाखाली दिली … .आदित्य तिच्या चापटीने इव्ह्ळला …”स्स्स आई ग …!! दिशू अग किती जोरात मारतेस ..लागले न मला ” दीक्षा चा तो प्रेमळ राग आदित्यला खूप आवडला .. .दीक्षा त्याला रागवू लागली …”तू … तू मूर्ख बेअक्कल, बेह्या बेशरम आदित्य गुप्ता,,नालायक…..कशाला आलास माघारी तिकडेच मेला असतास तर बर झाले असते .. आणि ”..ती पुढच काही बोलणार तेवढ्यात आदित्यने आपला उजवा हात तिच्या कंबरेत घातला आणि तिची कंबर गच्च आवळून तिला आपल्यावरती खेचले… आणि तीझ्या ..शिव्या चालू असणाऱ्या सुंदर ओठांमध्ये त्याने आपले ओठ सामावले आणि तिचे चुंबन घेतले ..त्या प्रेमळ ह्र्द्यभेदी स्पर्शाने दीक्षाचे डोळे आपोआप झाकले जाऊ लागले.. … तिच्या झाकलेल्या डोळ्यातून ..घळाघळा पाण्याचे थेंब बाहेर ओघळत तिच्या गालावर येऊ लागले.. आदित्यने आपले ओठ तिच्या ओठातून बाहेर काढले.. तशी दीक्षा त्याला कडकडून बिलगत मिठी मारत रडू लागली,….. तिच्या रडण्याने आदित्य हसला आणि म्हणाला …”ए वेडूबाई …काय झाल ग अस रडायला? ” ..ती रडत रडत म्हणू लागली ..”का रे ? का अस सोडून गेला होतास न सांगता ? तुला काहीच कस वाटल नाही रे माझ्या बद्दल..किती वाट पाहिली मी तुझी ..साधा एक फोन तरी करायचा जिवंत आहे म्हणून ” असे म्हणत म्हणत ती त्याच्या छातीवर हलके हलके मारत रडू लागली .. कि आदित्यने तिला अजून बिलगून घेतले .. कि खाली रॉकी भूकू लागला लाईट हि आली होती .. बाहेर गाडीचा आवाज आला गाडीतून अमित आणि अश्विनी बाहेर पडले… आदित्यस पाहून दोघे हि खुश झाले .अमित दिक्षास म्हणाला पाहिलस मी म्हणालो होतो न तुझ्या साठी पण एक गिफ्ट आहे हे होत ते गीफ्ट .. अश्विणीस आदित्य ने शुभेच्छा दिल्या .. आणि अमित कडे वळला तेव्हा अमित म्हणाला ..”काय रे भूत माझ्या या गोड मेहुणी ला तुला सोडून जावस कसे वाटले रे ” आदित्य म्हणाला अरे माझ खूप म्हत्वाच काम होत तिकडे एका पिशा ,,,…. अश्विनी मला खूप भूक लागली आहे बघ तू आणि दीक्षा आमच्या करिता काही तरी जेवण बनवान तो पर्यंत मी आणि अमित येथे बोलत बसतो ..आदित्य बोलता बोलता थांबला आणि त्याने दीक्षा व अश्विनीस जेवणाची तैयार्री करण्यास सांगतिले.. आदित्य आणि अमित ..बाहेरच सोफ्यावर बसले …आदित्य जरा गंभीर मुद्रेत होता आणि अमित ने ते हेरले अमित म्हणाला काय रे काय झाले असा चेहरा का पाडलास .. तेव्हा आदित्य त्या कडे वळला आणि म्हणाला .. तुला आठवतय का .. एक वेळ मी तुला तिकडून मला मिळालेल्या केस बद्दल सांगितले होते कोणती ती तीच ना एक प्रेत एका कुटुंबाच्या मुली मागे लागलेले आणि त्याने म्हणे त्या घराच्या मुख्य सदस्यात त्या मुलीच्या वडिलाच्या आत घुसून सर्व घरादारास मृत्यू तोंडी ढकलले.. आदित्य म्हणाला” हो हो तीच तीच केस “ “मी त्या घरातील मुलीच्या विनंतीने ते घर पिशाचमुक्त केले.. मी आज पर्यंत असले जुनुनी पिशाच नव्हते पाहिले.. त्या पिशाचा मुळे मला इथून जावे लागले.. म्हणून मला इथ येण्यास वेळ लागला ..” “हो अस पण तू हे मला पुन्हा का सांगतोयस ” तेव्हा आदी उत्तरला… इथ आपल्या इथ पण याच शहरात अशीच एक केस घडली होती…पण त्यात पिशाच नव्हते ..एका माणसाने वेडाच्या भरात येऊन आपल्या मुलीस आणि पत्नीस कुर्हाडीने जीव मारले.. आणि जिथ असे घडले होते ,,,.. ते घर हेच होते… ..” तेव्हा ते ऐकून अमित म्हणाला ”तुला काय म्हणायचं आहे नेमके ?” आदित्य म्हणाला मला संशय आहे कि या घरात पिशाच्च आहे…. त्याने आता पर्यंत दोन वेळा आपले वास्तव्य साध्य केल आहे ..तू चिंता करशील म्हणून… अश्विनीने तुला सांगितले नाही.. “तेव्हा अमित हसला “ह्हा हाहाह … काय तू पन अरे .. ज्या घरात खून झालेला असतो तिथ भूत असेलच अस काही नसते .. तू उगाचच कलजी करतोयस .. मला तर तस काही जाणवले नाही .. आणि अश्विनीस या घराबद्दल नाहीये तस काही तू खर्च काळजी करू नकोस .. अरे वा मस्त वास येतोय जेवण तैयार आहे वाटते..चल जेवण करूयात ” आदी त्याला थांबवत म्हणाला तुला जर वाटत असेल मी चेष्टा करतोय.. तर तस नाहीये . तरी पण … तू सावध राहा माझ काम तुला इथ असलेल्या धोक्या पासून सावध करन आहे मीत्राच्या नात्यान.. “ अमित उतरला “ठीक आहे चल आता नाहीतर जेवण थंड होईल ..” सर्वांनी जेवण उरकून घेतले.. सर्व उरकून झाले अमित आणि अश्विनी झोपण्यास जाऊ लागले अश्विनीस दीक्षा नि थांबवले आणि तिला एका कोपरयात नेऊन तिने तो अंगारा अश्विनीच्या माथी लावला .. आणि तिला म्हणाली “ताई काही चिंता करू नकोस आता आदी पण आला आहे आणि अमित जीजू तुझ्या सोबत आहेत त्यांना घडलेला प्रकार नकोस सांगू ” अश्विनी भीत भीत होकारार्थी मान हलवत झोपण्यास गेली आदित्यचा गंभीर चेहरा दिक्षाला गोंधळात टाकत होता कारण आदि आणि दीक्षा आदी कडे आली त्याचा चेहरा तेव्हाच गंभीर व्हायचा जेव्हा एखादी परेशानी असेल ती पण साधी नव्हे एखाद्या प्रेताची . असेल तर अमित इकडे झोपण्यास गेला होता.. पण जात जात त्या पूर्वी तो बाथरूम मध्ये जाण्यास निघाला..