तो आत मध्ये गेला… आणि रॉकी हि त्याच्या जवळ आला होता रॉकी दारात बसला होता आणि बसूनच त्याला पाहत होता ..अमित आत मध्ये गेला…त्याने आपले तोंड धुतले आणि आरशात पाहिले पाहताच क्षणी आरशात त्याला एक काळी प्रतिकृती दिसली त्या आरशात त्याला दिसली त्याच्या हातात एक कुऱ्हाड होती आणि तो दिसण्यास अतिशय विचित्र वाटत होता तो माणूस त्या आरश्यातून बाहेर येऊ लागला अमितला आपल्या जागेवरून हलता येईनासे झाले होते… तरी हि तो प्रयत्न करीत होता रॉकी बाहेरून भुंकत होता.. आदित्यने रॉकीचा आवाज ओळखला त्याला समजले काहीतरी नक्कीच गडबड आहे .आदित्य धावला आणि बाथरूम कडे जाऊ लागला ..आणि ते प्रेत अमित मध्ये त्याच्या श्वासाद्वारे प्रवेश करण्यात समर्थ झाले… होते ..आदित्य बाथरूम कडे धावला आणि त्याने रॉकीस बाजूस घेऊन शांत केले… आदित्यास अमित ला पाहून खूप वेगळ वेगळ वाटत होत.. त्याच्या हावभावात बोलण्यात फरक जाणवत होता… पण आदित्य त्याला काही बोलला नाही.. अमित आपल्या रूम मध्ये जाऊ लागला.. जात जात त्याने रॉकी कडे एका रागीट नजरेने कटाक्ष टाकला.. आणि बेडरूम मध्ये गेला.. पण तो अश्विनीचा जीव घेण्यास आत जात होता ते आदित्यच्या लक्षात आले नाही.. आदित्यनेत्याकडे थोड दुर्लक्ष केल आणि तो परत दीक्षा कडे आला.. आणि म्हणाला दिशू आता पर्यंत झालेल्या सर्व घटना मला सांग लगेच ताबडतोब दीक्षा ने सर घटना क्रमाक्रमाने सांगितल्या त्या ऐकल्या नंतर आदित्य शेवटी एका निष्कर्षावर येऊन ठेपला… आज पर्यंत त्याने exorcism च्या प्रयत्नाने बऱ्याच लोकांना मुक्त केल होत… आदित्यने दिक्षास त्या खोली कडे चलण्यास म्हणला जिथे तो पियानो होता दीक्षा आणि आदित्य त्या पियानो कडे जाऊ लागले आदित्यने त्या खोलीचा दरवाजा उघडला… कि आतून एक थंडगार वाऱ्याचा झुळूक त्या दोघांना भेदत त्यांच्या आरपार झाला.. तो झुळूकाचा भेद असहनीय थंड होता. त्या ठिकाणी अंधार होता . आदित्यने खिशातील लाईटर बाहेर काढून पेटवले..दीक्षा त्याच्या कडे रागाने पाहू लागली ती म्हणाली “हे केव्हा पासून मिस्टर “ आदित्य भांबरला अग नाही हे माझ नाहीये हे तर अमितच आहे “ “बर!! जीजुच आहे होय हे ठीक आहे” तेवढ्यात आदी विषय बदलत म्हणाला ..”अग हाच का तो पियानो..” आदी समोरील हूल खात असलेल्या पियानो जवळ गेला आणि बोलला ,,, आदी त्या वरती बसला आणि त्याने एक बीप वाजवल ..काहीच होईना … दीक्षा पुढे सरसावली.. कि अचानक तो पियानो आपोआप वाजण्यास सुरुवात झाली… त्या पियानो भोवती काही साउल्या फिरू लागल्या .. आदी ते समजण्याचा प्रयत्न करू लागल्या त्याने आपल्या खिशातून एक क्रिस्टल बाहेर काढला तो एका साखळीस लटकत होता आदिने तो आपल्या मुठीत बंद करून त्यावर त्याने काही तरी मंत्र म्हणाला … आणि त्याने त्या क्रिस्टल वर फुंकर मारत तो तळहातावर धरला तळहातावर धरता क्षणी समोरील साउल्या एका जागी थांबल्या त्या थांबताच आदिने क्रिस्टल दीक्षाच्या हातात ठेवला.. पण इकडे अमित आपल्यात असलेल्या पिशाच शक्तीस अडवू शकत नव्हता .. त्या पिशाचाने ज्या प्रमाणे वेडाच्या भरात आपल्या पत्नी आणि मुलीस कुऱ्हाडीने ठार केले होत तसेच अमितला त्याने पछाडले होते.. आणि अमित आज अश्विनीचा जीव घेणार होता… इकडे आदी त्या साउल्या जवळ जाताच त्यांना रंग रूप आकार आले चेहरा आला,,,… त्यात एक आई आणि तिची मुलगी खेळताना दिसत होते आणि त्यांच्या मागे,… त्या स्त्रीचा पती कुऱ्हाड घेऊन मारण्यासाठी येत होता… त्याच्या मानेवर कसली तरी खुण होती ..ते पाहून आदित्य ला काहीतरी आठवू लागले त्याला वाटू लागले कि त्याने कोठेतरी आधीपण पाहिली आहे ती खुण कि आदित्यच्या लक्षात आले त्याने ती खुण अमित च्या मानेवर बाथरूम मध्ये असताना पाहिली होती ” आदित्यला सर्व काही कळून चुकले कि अमित आता अमित नाही राहिला त्यात त्या पिशाचाने आपला समावेश केला आहे .त्या पिशाचाने आपल्या पत्नीस आणि इवल्याश्या जीवास मारले होते… म्हणजे अमित अश्विनीस आणि तिच्या पोटातील इवल्याश्या जीवास मारणार “ओह्ह नो” आदीच्या च्या तोंडून उद्गार बाहेर पडले ….. कि तो दिक्षास घेऊन अश्विनी कडे धावणार तेवढयातच त्याला मागून त्या साउल्या मधून कोणीतरी हाक मारले त्या लहान मुलीचा आवाज होता तो ती म्हणाली … ताई अजून एकदा वाजव न हे पियानो आई वाजवायची .. दीक्षा त्या मुलीस पाहून घाबरली आणि ती आदी जवळ आली.. आदिने तिला म्हणले .. वाजव तो पियानो … दीक्षा म्हणाली का ? आदी उत्तरला ”कारण याच्या आवाजाने तिला तृप्ती मिळते. आणि ती आपल्या खऱ्या पिशाची योनीत येऊन मुक्त होईल … तू वाजव मी आहे तुझ्या सोबत .. गो ! दिशू यु कॅन डू इट” दीक्षा तीच धून वाजवू लागली ती मुलगी चिरकू लागली तिचा आवाज जीवघेणा येत होता…त्या आवाजाने इकडे अश्विनी जागी झाली आणि समोर तिच्या अमित उभा होता तो देखील कुऱ्हाड घेऊन ..अमितने कुऱ्हाडीने तिच्यावर वार केला ….”य्याआआआह्ह्ह… खच्च” पण .. अमित ने केलेला तो वार निष्फळ होता ..